शाळांना लागली शासनाच्या अन्नाची अपेक्षा.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
✍️जिल्हा प्रतिनिधी✍️
🔥बालाजी चव्हाण🔥
जिवती :- शासनाच्या महत्वाकांक्षी “पी.एम.श्री” योजनेअंतर्गत येणाऱ्या जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या 8 दिवसांपासून मध्यान्ह भोजन मिळत नाही. शासनाकडून तांदूळ, डाळ, तेल यासारखे राशन वेळेवर न आल्याने ही वेळ आली आहे. परिणामी शाळेतील 120 हून अधिक विद्यार्थ्यांचे जेवण बंद झाले होते. मात्र विद्यार्थी उपाशी राहू नयेत म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत स्वखर्चाने गेल्या 8 दिवसांपासून मुलांना जेवण देण्याची व्यवस्था केली आहे.राशन न आल्याने शाळा 8 दिवसांपासून मध्यान्ह भोजनाविना सुरू होती. याची दखल घेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली आणि स्वतःच्या पैशाने शिजवून मुलांना जेवण दिले.
उपाशी विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन समितीचा मोठेपणा
शाळेतील विद्यार्थाना मध्यान भोजन मिळत नसल्याने व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता कांबळे,उपाध्यक्ष गजानन चव्हाण आणि इत्तर सदस्य यामध्ये विजय गोतावळे,बाळू ठोंबरे, प्रकाश राठोड,जयंत गोतावळे, सोनुताई घोडके,आशाताई भालेराव,संगीताताई ठोंबरे,सविताताई घंटेवाड,रेखाताई पवार,ज्योतिका पवार या सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना पोळी-भाजी, डाळ-भात अशी साधी पण पौष्टिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
पालक आणि शिक्षक चिंतेत.
रोज 120 मुलांचे जेवण करणे सोपे नाही. समितीच्या लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे घातले. पण हे किती दिवस चालणार?” असा प्रश्न मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे. पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे. “सरकार योजना आणते पण राशन वेळेवर देत नाही. आमची मुले उपाशी राहतील का?” असे पालक म्हणतात.या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने शासनाला लेखी मागणी केली आहे की, जिवती तालुक्यातील सर्व शाळांना मध्यान्ह भोजनाचे राशन लवकरात लवकर पुरवण्यात यावे.







