महाराष्ट्र लाईव्ह पोर्टल न्यूज
मुख्य संपादक
संतोष उत्तम झाडे मो.नं.9730526497/9130233021
पी.एम.श्री अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश
चिमूर – : पी.एम.श्री अनुसूचितजाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर येथील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील एकूण ७ पात्र विद्यार्थिनींपैकी ६ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत.तसेच तालुक्यातील एकूण १२ पात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६ विद्यार्थिनी या पी.एम. श्री अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर येथील आहेत ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.या परीक्षेत कु. बोदीक्षा गायकवाड हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले आहे. कु. एंजल गेडाम, कु. प्रांजली अवथरे, कु. संचिता शंभरकर, कु. अनुराधा गेडाम, कु. सानिका शेरके या यशस्वी विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता खोब्रागडे यांचे सक्षम नेतृत्व व मार्गदर्शन लाभले. तसेच दत्तात्रय पुलेनवार, विनय खापर्डे, राजरत्न गजभिये, प्रतिक्षा घ्यार आणि प्रिया बोरकर या शिक्षकांनी विद्यार्थिनींना विशेष शैक्षणिक मार्गदर्शन केले.शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजकल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती दिपाताई म धोळ, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसादजी कुलकर्णी, चंद्रपूर जिल्ह्याचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे तसेच चिमूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विशाल बोदाडे यांनी विद्यार्थिनी, शिक्षक व शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, या यशामुळे इतर विद्यार्थिनींनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.






