जोगापूर येथील सिंधुबाई गावडे यांच्या संसाराला दिला आर्थिक आधार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀गोंडपिपरी प्रतिनिधी : शरद कुकुडकार
गोंडपिपरी : तालुक्यातील जोगापूर येथे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे तसेच घरावरील फाटे जळून खाक झाल्याने विधवा मजूर महिला सिंधुबाई बंडू गावडे यांच्यावर मोठे संकट कोसळले. अशा कठीण प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वडेट्टीवार यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करत त्यांच्या संसाराला आधार दिला. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या सिंधुबाई गावडे यांना मोठा दिलासा मिळाला असून, गावकऱ्यांनीही या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आगीत संसाराची राखरांगोळी.!
जोगापूर येथील सिंधुबाई बंडू गावडे यांच्या घराला १२ ऑक्टोबर रोजी अचानक आग लागली. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य तसेच घरावरील फाटे जळून खाक झाले. या दुर्घटनेत त्यांच्या संसाराचे मोठे नुकसान झाले. आधीच विधवा असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिंधुबाई यांच्यासमोर या घटनेमुळे मोठे संकट उभे ठाकले.
संकटाच्या काळात मदतीचा हात.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वडेट्टीवार यांनी तत्परता दाखवत गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जोगापूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी आगग्रस्त सिंधुबाई गावडे यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत आधार दिला.आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने सिंधुबाई यांच्यासमोर दैनंदिन गरजा भागविण्याचा तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या मदतीमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला. संकटग्रस्त महिलेच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
यावेळी गोंडपिपरी तालुका उत्तम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचनकर, कमलेश निमगडे, महेंद्र कुणघाडकर, विपिन पेदूलवार, राजेश डोंगरे, सारनाथ बक्षी, पुष्पा पेंदोर, विमल कतलाम, हर्ष महेशकर, दिलीप चापले यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







