🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀गोंडपिपरी प्रतिनिधी :- शरद कुकुडकार
गोंडपिपरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील श्लोक आनंद वनकर याची राष्ट्रीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राने २८ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या निवडपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे.राज्यस्तरीय अंडर-१७ मुला-मुलींच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर श्लोकची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची ही त्याच्यासाठी महत्त्वाची संधी असून, त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.राष्ट्रीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धा ३ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान मथुरा, उत्तर प्रदेश येथे होणार आहे. या स्पर्धेपूर्वी महाराष्ट्र संघासाठी १ व २ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे प्रशिक्षण व निवड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. निवड झालेल्या खेळाडूंना १ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे रिपोर्टिंग करणे अनिवार्य आहे. श्लोक चे वडील आनंद वनकर हे नगर पंचायत येथे कर्मचारी असून त्यांनी मुलाला घडविण्यात खूप परिश्रम घेतले आहे.श्लोकच्या निवडीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







