🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀गोंडपिपरी प्रतिनिधी :- शरद कुकुडकार
गोंडपिपरी : सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणारे तसेच सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नागेश ईटेकर यांची औद्योगिक विभाग तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते नागेश ईटेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. औद्योगिक विभाग काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कमलेश निमगडे आणि तालुकाध्यक्ष दर्शना दुर्गे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या ईटेकर यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिक, युवक आणि कामगारांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या नियुक्तीबद्दल रामदास मोहूर्ले, दिलीप वासेकर, महेंद्र कुणघाडकर, माधव लडके, विनय मोहूर्ले, योगेश कोरवते, अतुल झाडे, अमित भसारकर, विनोद धोडरे, हर्ष महेशकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागेश ईटेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







