राजुरा–ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी; कार्यकर्त्यांकडून स्वागत, अभिनंदनाचा वर्षाव.
🌍महाराष्ट्र लाईव्ह पोर्टल न्यूज🌍
✍️मुख्य संपादक✍️
🔥संतोष उत्तम झाडे🔥
गोंडपिंपरी : शिवसेना (शिंदे गट) सोशल मीडिया विभागाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी गोंडपिंपरी तालुक्यातील तारसा येथील युवा कार्यकर्ते नितीन धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे राजुरा व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या संघटनात्मक बळकटीसाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्र व जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये नितीन धानोरकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नितीन धानोरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, युवकांना संघटनेशी जोडणे तसेच स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे.या नियुक्तीनंतर गोंडपिंपरी तालुक्यासह राजुरा, ब्रह्मपुरी व जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थकांनी नितीन धानोरकर यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात सोशल मीडिया विभाग अधिक सक्षम करत पक्षाची धोरणे, विकासकामे आणि जनहिताच्या भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ते कार्यरत राहतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करताना नितीन धानोरकर यांनी, पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली. कूपालजी तुमाने, मनिषाताई कायदें ,योगेशजी पौनकर जिल्हा प्रमुख बंडू भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली .कोट :”पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. राजुरा व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात सोशल मीडिया संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करेन.”— नितीन धानोरकर, चंद्रपूर जिल्हा प्रमुख (सोशल मीडिया), शिवसेना शिंदे गट







