दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी नशा मुक्ती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.
महाराष्ट्र लाईव्ह न्युज प्रतिनिधी चंद्रपूर
हिमायू अली
चंद्रपूर :- दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोदय शिक्षण मंडळ अंतर्गत शांताराम पोटदुखी विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एजाज शेख सर यांनी आजची पिढी नशा मुळे कशाप्रकारे विकृत होत चाललेली आहे ते थांबविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले.या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम नशा मुक्ती विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता एडवोकेट फरहात बेग सर यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर पंकज काकडे यांनी म्हणाले की नशे पासून दूर राहिल्यास युवक प्रगती करणार आणि युवक प्रगती केल्यास नक्कीच देश प्रगती करणार. प्रमुख पाहुणे एडवोकेट फरहात बेग नशा मुक्ती या विषयावर बोलताना म्हणाले की समाज व्यवस्थेवर नशा केल्याने किती गंभीर परिणाम झालेले आहेत, आणि येणारी युवा पिढी कशी वाचवता येईल, यासाठी आणि या सारख्या वाईट प्रकारचे व्यसनापासून आपण कसे दूर राहावे त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रामुख्याने मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी प्रमुख डॉक्टर सरोज कुमार दत्ता, एडवोकेट बेग सर, वाईस प्रिन्सिपल डॉक्टर पंकज काकडे वाईस प्रिन्सिपल डॉक्टर पूर्नेंदू कुमार कार आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख नंदकिशोर भंडारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शेवटी सर्वांनी मिळून नशेपासून मुक्त राहणार आणि कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली या कार्यक्रमात भरपूर संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस चे विद्यार्थीनी भूमिका हिंगाने हिने केले.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज पोर्टल🌍
✍️मुख्य संपादक✍️
🔥संतोष उत्तम झाडे🔥
📱मो.नं.9730526497/9130233021






