
माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर : देगलूर तालुक्यातील शहापूर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नरदेव बालरेड्डी पुल्लागोर तसेच व्हाईस चेअरमनपदी सुर्यकांत गंगाधर अन्नमवार यांची एकमताने (बिनविरोध) निवड करण्यात आली. या निवडीचे परिसरातील शेतकरी, सभासद व विविध मान्यवरांनी स्वागत करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. निवडीनंतर सोसायटीच्या कार्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल व श्रीफळ देऊन नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी सभासदांनी सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन नरदेव बालरेड्डी पुल्लागोर यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, सर्वांना सोबत घेऊन सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. तसेच व्हाईस चेअरमन सुर्यकांत गंगाधर अन्नमवार यांनीही शेतकरी हिताला प्राधान्य देत सोसायटीच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल परिसरातील विविध सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला या निवडी वेळी शिवाजी कंनकनटे, गोपारेडी पुलगोर, गंगारेड्डी कोडगिरे गणेश चामावार, मल्लनरेड्डी यामावार, गंगारेड्डी यामावार, भगवान बासरे, विलास यालावार, गणेश माडपले, अलारेड्डी चिंतलवार, किशन पाटील, ओम बासरे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.






