श्रीगुरुदेव सेवा मंडळ राजुरा तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..!
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
प्रविण चिडे विरुर स्टेशन राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा : अध्यात्म,स्वच्छता, ग्रामविकास,सामाजिक एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी राजुरा तालुका श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.ऑगस्ट क्रांती पर्वाचे औचित्य साधून श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित झाले. यावेळी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून ‘माणूस म्हणून माणसाशी वागावे’, सर्वधर्मसमभाव, स्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामविकास आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश दिला. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करत त्यांनी लोकजागृतीचे प्रभावी कार्य केले. त्यांच्या विचारांनी ग्रामीण भागातील जनजीवनावर मोठा प्रभाव पाडला असून, ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून त्यांनी ग्रामविकास आणि समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखविला.राष्ट्रसंतांच्या या महान कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मागणीकडे केंद्र सरकारकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नसल्याची भावना श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.ऑगस्ट क्रांती पर्वाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रभक्ती, सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांना अभिवादन करत केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव ‘भारतरत्न’ पुरस्काराने करावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी प्रचारक ॲड. राजेंद्र जेनेकर, तालुका सेवाधिकारी लटारू मत्ते, उपसेवाधिकारी विनायक सोयाम, संघटक मनोहर बोबडे, नगरसेवाधिकारी बळीराम बोबडे, भजनप्रमुख प्रल्हाद ऊईके, सचिव मनोहर पासपुते, ॲड. सारिका हिरादेवे-जेनेकर, प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे, युवकप्रमुख गजानन बोबडे, प्रचारक प्रविण चिडे, तसेच वामन देवतळे, बाबुराव पहानपटे, नरेंद्र मोहारे, राजू कौरासे, उद्धव झाडे, रामचंद्र रासेकर, रमेश भोयर, मारोती लांडे, पांडुरंग पोटे, महादेव वाघमारे, मंगेश गौरकर, यशवंत पवार, प्रभाकर मुक्के, ताराचंद भोयर, पुंडलिक मडावी, मारोती डाहुले, मधुकर मटाले, भास्कर वाटेकर, आनंदराव बरडे, सुधाकर काकडे, श्रीहरी ठमके, शशिकला बोबडे, संध्या मत्ते, मनीषा रोहने, शकुंतला दवंडे, कांताबाई बोबडे, सुचिता बोबडे, कमलबाई देरकर, रेखा लोहे, भाऊराव बोबडे, मारोतराव येरणे, प्रभाकर लडके, नानाजी करमनकर, परशुराम बोरुले, चेतन जयपूरकर, संगेश पावडे, आनंदराव उताने, वासुदेव चाफले, मनोहर कायडिंगे यांच्यासह श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान व्हावा आणि त्यांच्या विचारांचा गौरव ‘भारतरत्न’ पुरस्काराने करण्यात यावा, या मागणीला यापुढेही व्यापक जनसमर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज पोर्टल🌍
✍️मुख्य संपादक✍️
🔥संतोष उत्तम झाडे🔥
मो.नं.9730526497/9130233021
👆 जाहिराती व बातम्या करिता संपर्क साधा👆







