चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर :- रक्त दान हेच श्रेष्ठ दान ह्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दल तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या विद्यमाने आज सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक जिल्हा चंद्रपूर यांच्या जन्मदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय ड्रिल शेड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिरा मध्ये होमगार्ड जिल्हा पोलीस महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व पोलीस जीम ग्रुप यांच्या कडून रक्तदान करण्यात आले. एकूण ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले.विशेषतः ज्या रक्तदात्यांना ५ लाख रक्कमेचा अपघात विमा दिल्या गेला. ह्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी. प्रमोद चौगुले सर पोलीस मुख्यालय राखीव निरीक्षक किसन नवघरे सर रामनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य मा.श्री.राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले विदर्भ अध्यक्ष आशुतोष चव्हाण विदर्भ महिला अध्यक्ष आरती सुधीर जांगळे ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये परमेश्वर बळीराम चव्हाण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र बॉईज संघटना यांच्या नेतृत्वात मुकेश चव्हाण चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू पाटील महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक शिला दिलीप जाधव महिला आघाडी अध्यक्ष राहुल पोदार जिल्हा सह संघटन मानव झाडे जिल्हा सोशल मीडिया प्रभारी दिलीप जाधव जिल्हा सदस्य प्रेम जाधव तालुका सदस्य चंद्रपूर सुजाता दुर्गे महिला आघाडी अध्यक्ष राजुरा तालुका प्रिया बोरकर महिला आघाडी सचिव राजुरा कविता उमरे जिल्हा राजुरा तालुका संघटक तसेच हिमांशू रायपुरे पोलीस बॉईज अमरावती. मयूर गोतकर रुबाब वर्दीचा चे संचालक. व संघटना चे चंद्रपूर जिल्हा मधील सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
✍️मुख्य संपादक✍️
🔥संतोष उत्तम झाडे🔥
मो.नं.9730526497/9130233021
👆👆 बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा







