युवासेना जिल्हा प्रमुख महेश चौधरी यांची पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे मागणी.
अर्पित वाहाणे
मो 8956647004
वर्धा :- बाजारवाडा-हरदोली या दोन्ही गावाच्या मधात घनदाट असे जंगल आहे. त्याचा फायदा घेऊन गावठी दारूच्या भट्ट्या सर्रासपणे चालू आहे या ग्रामीण भागातील रोडचा सर्रासपणे दारू वाहतुकीसाठी केला जातो. दारू ग्लासाने नाही तर मोठमोठ्या ट्यूब ने विकली जात आहे. परिणामी गावातील लहान मुले या गावठी दारूच्या बाटल्यांना बळी पडत आहे. तसेच हा कुठलाही छोटा व्यवसाय नसून जंगल भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या चालू आहे प्रशासनाचे याकडे याकडे अजिबात लक्ष नाही कुणाच्या आशीर्वादाने या भट्ट्या चालू आहे हे कळत नाही आता गावोगावी पोळा,महालक्ष्मी, गणपती असे विविध उत्सव पारंपारिक पद्धतीने पार पडत आहे परंतु या गावातील लोक मुले या दारूच्या व्यसनाला बळी पडत आहे आज बाजारवाडा गावांमध्ये गणपती उत्सवात अनेक कार्यक्रम,कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे आम्हाला अशी शंका आहे की या उत्सवात दारुडे काही समाजकंटक विघ्न आणतील म्हणून पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांना निवेदनद्वारे विनंती करण्यात आली की आदरणीय पोलीस निरीक्षक आर्वी यांना त्वरित आदेश देऊन बाजारवाडा हरदोली परिसरातील सर्व दारूच्या भट्ट्या उध्वस्त करून लावन्यात याव्या अशी मागणी गावातील नागरिक तसेच युवासेना जिल्हा प्रमुख वर्धा श्री. महेश चौधरी यांनी केली पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या कडे केली आहे.







