सागर मोटघरे ला आमदार सुमित वानखडे चा सपोर्ट
महाराष्ट्र लाईव्ह न्युज प्रतिनिधी वर्धा
अर्पित वाहाणे
मो. 8956647004
आर्वी (वर्धा):- आर्वी येथील महाराणा प्रताप वॉर्डातील प्रलंबित विकासकामांचा आणि बुद्ध विहाराच्या बांधकामाचा प्रश्न जनसामान्यांसमोर मांडल्याच्या कारणावरून, स्थानिक पत्रकार अर्पित वाहाणे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बी जे पी अनुसूचित जाती अध्यक्ष सागर मोटघरे यांनी ही मन्हानी चा दावा टाकण्याची धमकी दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, या घटनेविरुद्ध आता पत्रकारांनी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.नेमका प्रकार कायमहाराणा प्रताप वॉर्डातील बुद्ध विहार आणि सार्वजनिक वाचनालयाचे काम प्रलंबित असल्याने, स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची आठवण करून देणारी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे संतप्त झालेल्या सागर मोटघरे आणि ऋषी मोटघरे आणि ऋषीं मोटघरे यांनी पत्रकार अर्पित वाहाणे यांना गाठून, “ही बातमी का लावली?” असा जाब विचारत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला:एका पत्रकाराने जनतेच्या समस्या मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, विकासकामांचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे पत्रकाराला थेट जिवे मारण्याची धमकी देणे, हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला थेट हल्ला आहे. या घटनेने संपूर्ण आर्वी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल किती वाढले आहे, हे यावरून स्पष्ट होते.जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव:या गंभीर घटनेची दखल घेत पत्रकार अर्पित वाहाणे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. धमकावणाऱ्या या दोन्ही आरोपींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.संतप्त मागणी:पत्रकार अर्पित वाहाणे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या बी जे पी अध्यक्ष अनुसूचित जाती सागर मोटघरे यांना तात्काळ अटक करावी.पत्रकारांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.विकासकामांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकशाहीवादी आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा.जर या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन कारवाई झाली नाही, तर आर्वी तालुक्यातील पत्रकार संघटना आणि सर्वपक्षीय नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







