विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी मनविसेचे आवाहन;
चामोशीत सदस्य नोंदणी अभियानाचा धडाका!
गडचिरोली / चामोर्शी : – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) गडचिरोली जिल्हा व चामोर्शी तालुक्याच्या वतीने आयोजित सदस्य नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या, सोयी-सुविधा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यासाठी मनविसे नेहमीच अग्रभागी राहिली आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून चामोर्शी शहरात विशेष सदस्य नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून मनविसेचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.ऑफलाईनसोबत ऑनलाईन नोंदणीची सोयजे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑफलाईन फॉर्म भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मनविसेने ऑनलाईन नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही सहजपणे या अभियानात सहभागी होता येत आहे.”विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि न्यायहक्काच्या लढ्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावे व मनविसेचे सदस्य व्हावे.”— मनविसे पदाधिकारी, गडचिरोली जिल्हाया नोंदणी शिबिरादरम्यान मनविसेचे विविध जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
✍️मुख्य संपादक✍️
🔥संतोष उत्तम झाडे🔥
मो.नं.9730526497/9130233021







