काही महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा; दुपारी हलक्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀प्रतिनिधी :- शरद कुकुडकार🌀
गोंडपिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला अखेर दिलासा मिळाला आहे. आज दुपारी परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी सुखावला आहे.पावसाने दडी मारल्याने पिकांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. कापूस, सोयाबीन, धान यांसह विविध पिकांना पाण्याची नितांत गरज होती. अशा परिस्थितीत आज झालेल्या हलक्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.अनेक दिवसांपासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पावसामुळे समाधान दिसून येत आहे. “अखेर पाऊस बरसला आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला,” अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.







